Ad will apear here
Next
पुण्यात ‘युनिक जेम्स अँड ज्वेलरी इंटरनॅशनल शो’चे आयोजन
पुणे : ‘पुणे शहराला ‘ज्वेलरी हब’ बनविण्याबरोबरच सराफ व व्यापाऱ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन, पुणे सराफ असोसिएशन आणि स्टायलस इव्हेन्ट्स इंडिया यांच्या वतीने पाचव्या ‘युनिक जेम्स अँड ज्वेलरी इंटरनॅशनल शो २०१९’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १५, १६ व १७ जून २०१९ या कालावधीत पिंपरी-चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत होईल,’ अशी माहिती सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

हे प्रदर्शन सराफी व्यावसायिकांबरोबरच सराफी व्यापारी व सराफी व्यवसायाशी सबंधित असलेल्यांसाठी विनामूल्य खुले असेल. या वेळी स्टायलस इव्हेंट्स इंडियाचे संचालक रणजीत शिंदे, श्रीकुमार के. पी., पुणे सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष नितीन अष्टेकर, सचिव अमृतलाल सोलंकी,  सहसचिव राजाभाऊ वाईकर, खजिनदार कुमारपाल सोलंकी, कार्यकारिणी सदस्य फुलाचंद ओसवाल, अशोक अष्टेकर, रमेश सोनिगरा, विपुल अष्टेकर, योगेंद्र अष्टेकर व कांतीलाल धोका आदी उपस्थित होते.            

फत्तेचंद रांकाअधिक माहिती देताना रांका म्हणाले, ‘पुणे सराफ असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन यांच्या सहकार्याने दर वर्षी हे प्रदर्शन भरवले जाते. हे या प्रदर्शनाचे हे सलग पाचवे वर्ष असून, यात जेम्स अॅंड ज्वेलरी व या संबंधित मशिनरी ४००हून अधिक स्टॉल्स असणार आहेत. हे प्रदर्शन ‘बिझनेस टू बिझनेस’ स्वरूपात असणार असून, जगभरातील रत्ने आणि दागिन्यांचे प्रकार, त्यासाठी वापरात असलेले तंत्रज्ञान, विविध डिझाइन्स, ट्रेंड्स व्यापाऱ्यांना एकाच छताखाली पाहता येणार आहे.’

प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष व रांका ज्वेलर्सचे फत्तेचंद रांका यांच्या हस्ते होणार असून, यात टेंपल ज्वेलरी, अॅन्टिक ज्वेलरी, जडाऊ, बिकानेरी, पोलकी वर्क्स, कुंदन, ठुशी, कंटेम्परी, मंगळसूत्र, मशीन व हाताने निर्माण केलेल्या चेन, बांगड्या, रिंगा आणि नथ यांचा समावेश असेल. महाराष्ट्रातील दागिन्यांची गरजेप्रमाणे विविध मशिनरी, नवीन टेक्नॉलॉजी, ज्वेलरी क्लस्टर व्यवसाय उभारण्याची योग्य ती माहिती यांबरोबरच सुरक्षा व सावधानीसाठी आवश्यक ती यंत्रे या प्रदर्शनामध्ये पाहता येणार आहेत.                        

‘आज देशभरात दागिन्यांशी निगडीत अनेकविध प्रदर्शने होत असतात. ज्यामधून व्यापाऱ्यांना एक व्यासपीठ मिळत असते; पण राज्यात आणि त्यातही पुण्यात अशा प्रकारची प्रदर्शने होत नाहीत. हेच लक्षात घेत पुण्यासारख्या शहराला ‘ज्वेलरी हब’ बनविण्याच्या दृष्टिने आम्ही हे आगळेवेगळे प्रदर्शन आयोजित केले आहे. महाराष्ट्रातील लहान व मोठे सराफ सुवर्णकार, तसेच महाराष्ट्राबाहेरील सराफ सुवर्णकार यांना या प्रदर्शनाच्या माधमातून एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचा आमचा मानस आहे,’ असे श्रीकुमार के. पी. यांनी सांगितले.

‘या प्रदर्शनाच्या माध्यमातून राज्यातील व्यापाऱ्यांना आम्ही एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणार असून, व्यापार वृद्धीबरोबरच व्यापाऱ्यांना जागतिक बाजारपेठेतील बदल लक्षात येण्यासाठी या प्रदर्शनाचा उपयोग होईल यात शंका नाही,’ असे मत या वेळी रणजीत शिंदे यांनी व्यक्त केले.

प्रदर्शनाविषयी :
कालावधी :  १५, १६ व १७ जून २०१९ 
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी सहा
स्थळ : ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर, पिंपरी-चिंचवड.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZUICB
Similar Posts
रांका ज्वेलर्सचे बारावे दालन कोंढवा येथे सुरू पुणे : १४० वर्षाची परंपरा असलेल्या सुप्रसिद्ध रांका ज्वेलर्सच्या बाराव्या सुवर्ण दालनाचा नुकताच कोंढवा येथे शुभारंभ झाला. पाच हजार चौरस फुटांच्या या प्रशस्त सुवर्णदालनाचे उद्घाटन रांका परिवारातील आजीपासून ते नातीपर्यंतच्या महिला, मुली या सर्वांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रांका परिवाराला शुभेच्छा
‘रांका ज्वेलर्स’चे अकरावे दालन पिंपळे सौदागरमध्ये पुणे : गेल्या १४० वर्षाची परंपरा असलेल्या ‘रांका ज्वेलर्स’चे अकरावे दालन आता पिंपळे सौदागर येथे सुरू होत आहे. कोकणे चौक येथील ‘भूमी अलीयम’ या इमारतीत असलेल्या या भव्य दालनाचे उद्घाटन रविवारी, ३१ मार्च २०१९ रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे.
रांका ज्वेलर्सचे ११ वे दालन पिंपळे सौदागर येथे सुरू पुणे : १४० वर्षाची परंपरा असलेल्या रांका ज्वेलर्स परिवाराच्या पिंपळे सौदागरमधील कोकणे चौक येथे असलेल्या ११ व्या सुवर्ण दालनाचे नुकतेच शानदार उद्घाटन झाले. मार्च महिना हा स्त्री शक्तीचा गौरव करण्यासाठी सुपरिचीत आहे. याचेच औचित्य साधून या सुवर्णदालनाचे उद्घाटन रांका परिवारातील आजी पासून नातीपर्यंतच्या
‘प्लास्टिक, कचरामुक्त मुळशी तालुका’ अभियानास प्रारंभ पुणे : ‘प्लास्टिक, कचरामुक्त मुळशी तालुका’ अभियानास सोमवारी बेलावडे (ता. मुळशी) येथे प्रारंभ करण्यात आला. लायन्स क्लब ऑफ पुणे कोथरुड, एन्व्हायर्नमेंट​ल क्लब ऑफ ​इंडिया या संस्थांनी या अभियानासाठी पुढाकार घेतला आहे. ‘लायन्स’ आणि ‘एन्व्हायर्नमेंटल’च्या वतीने ​​प्लास्टिक ​समस्या सोडविण्यासाठी प्लास्टिक कचऱ्याला पाच रुपये हमी भाव देण्यात येणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language